STORYMIRROR

Sanjana Kamat

Tragedy Others

3  

Sanjana Kamat

Tragedy Others

लक्ष्मणरेषा

लक्ष्मणरेषा

1 min
11.8K

लक्ष्मणरेषा बाबांच्या डोळ्यात दिसायची.

आईने दिलेल्या संस्कारातून काळजात वहायची.

नवऱ्याच्या काटेरी बंधनात गुलाब होत जगायची.

साऱ्यांच्या सुखात स्वतःला विसरून हसायची.


भ्रमर होत असायचे कित्येक घुटमळणारे.

कुणी फसते का बघत जाळ घेऊन बसणारे.

हिंमतच नसायची लक्ष्मणरेषे शिवाय जगायची.

ह्दयात सदैव संस्काराचे दडपण घेत जगायची.


त्या काळचा तो साचाच बहुतेक हरवलाय.

दिसणारा माणूसकीचा झरा ही भूर्सटलाय.

लक्ष्मणरेषेत राहणारा काळ आता सरलाय.

आपल्याच रक्ताशी रक्तपिपासू होत बसलाय.


अनैतिक वागणूकींचा गळफास डोके शोधतोय.

संस्कृतीची देवाण घेवाण घेऊन मिरवतोय.

पेरणार तेच उद्या उगवणार,हेच विसरतोय.

स्वतःचाच पाय कुऱ्हाडावर ठेवून जगतोय.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy