STORYMIRROR

अरविंद कुलकर्णी

Inspirational

4  

अरविंद कुलकर्णी

Inspirational

लिलाव

लिलाव

1 min
222

लई सकाळी बाप माझा

तालुक्याला गेला होता

गाडीमंदी चुंगड टाकून

माल बाजाराला नेला होता


छोट्या चिंगीला फराक अन्

मला नवं दप्तार घेणार व्हता

ठिगळं गाठीचं माय च लुगडं

नवी नाटी आणणार होता.


यापार्यान लिलाव केला

कवडी मोलाचा भाव आला

आता पैका नाही ,

परवा देणार व्हता


गळालं आवसान पायातलं

बाप हिरमुसला झाला होता

घरादाराच्या सपनांचा आज

लिलाव झाला व्हता.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational