STORYMIRROR

Gopal Ingle

Romance

3  

Gopal Ingle

Romance

लिहितांना तुझ्यासाठी

लिहितांना तुझ्यासाठी

1 min
324

प्रेम केले तुझ्यावरर्ती

दुनियेला ते काय कळे

लिहितांना तुझ्यासाठी

डोळ्यांतले थेंब गळे


तेच डोळे काजळाचे

पाहतांना जीव जळे

गोऱ्या गोऱ्या गालावरती

चांदण्याची झिल खळे


पायातले पैंजण झुले

चालतांना बळ मिळे

ओठातले पळस वल्ले

लाल झाले तुझ्यामुळें


ये नां राणी बांदावरती

मेघ मातीला ग जुळे

झड होऊनी श्रावणाची

डव्हाळू प्रेम तळे



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance