STORYMIRROR

TRUPTI PATIL

Fantasy Others

3  

TRUPTI PATIL

Fantasy Others

लहरी पाऊस

लहरी पाऊस

1 min
296

 घननिळ्या श्रावणात

 असा पाऊस लहरी

 सृष्टी हिरवी गीतांनी

 सूर ओलेत्या प्रहरी||१||


 दाट धुके खेळ खेळे

 निळा धुसर पारवा

 ओल्या श्रावणाची भेट 

 थंड वाऱ्याचा गारवा||२||


 इथे गवत डोलते

 आनंदात भुईवरी 

 मन मोहे इंद्रधनु

 लख्ख ऊन नदीवरी||३||


 भिजलेले कणकण

 ऋतू सुगंधित सारा 

 प्रफुल्लित चराचर

 आनंदाचा वाहे वारा||४||


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy