Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Mahesh Raikhelkar

Inspirational

3  

Mahesh Raikhelkar

Inspirational

लहानपण देगा देवा

लहानपण देगा देवा

1 min
480


घालत होतो मी कोणताही पेहराव

फॅशनची नव्हती तेव्हा कसलीच हाव

झाली जरी मित्रांसोबत भांडणे आणि कट्टी

थोड्या वेळातच जमून जाई आमची पुन्हा गट्टी !


नव्हती घड्याळाच्या काट्यावरची कसरत

खेळत घालवत होतो दिवस रमत-गमत

नव्हती कोणतीच माझ्यावर जबाबदारी

आयुष्य होते ते फारच सुंदर भारी !


नव्हती कोणती चिंता आणि घोर

रंगवत असे मी छान चित्रातील मोर

जरी तेव्हा कधी बसलो मी रुसून

हट्ट पुरवला की बघत असे हसून !


नव्हती कोणतीच स्पर्धा ही जीवघेणी

नाचत म्हणत असे मी बडबड गाणी

सगळं जग वाटे मला छान-छान

रमून जात असे त्यात माझे बालपण !


सगळेच करत होते माझा लाड

लाडाने आई-बाबा म्हणत होते आहे मी लबाड

लागत नव्हता मला मान आणि सन्मान

माहित नव्हता मला काय असतो अपमान !


 जाती-पातीचा तेव्हा मनात नसे विचार

गरीबी-श्रीमंतीचा ना पडे वागण्यावर असर

दंगा-मस्ती करण्यास मिळाले सवंगडी चार

आनंदाचा सोहळा होईल आमचा साकार !


काय कामाचे देवा असले हे मोठेपण

जीव माझा गेला पुरता रे वैतागून

जगावे लागते खोटे मुखवटे घालून

हरवून बसलो त्यातच माझे मीपण 


देवा तुझ्याकडे मागतो एक छोटसं मागणं

कर मला परत एकदा लहान

असेल निर्व्याज, निर्मळ, सुंदर मन

नसेल वासना, असूया, इर्षेची त्यात घाण !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational