STORYMIRROR

UMA PATIL

Romance

3  

UMA PATIL

Romance

लग्नसोहळा

लग्नसोहळा

1 min
13.4K


नयनांचे नयनांना इशारे कळले

तुझ्यावर माझे प्रेम असे गं जडले

बघितल्या तुझ्या वेगवेगळ्या अदा

मी झालो बघ तुझ्यावरच गं फिदा

तुला विचारण्याची होईना हिंमत

प्रेमाने केली माझी अशी गत

तू दिसल्यावर मी लटपट कापतो

माझ्या मनावर तुझे चित्र छापतो

प्राण कंठात साठवून विचारतो तुला,

तू देशील का आजन्म साथ मला ?

तुझ्या प्रेमात दिवस-रात्र झुरतो

तुझ्यासाठी रोज असा मरतो

आपण करू सुखाचा संसार

नेहमी असेल मी तुझा आधार

सोबतीने घालवशील का आयुष्य ?

बघशील का सुखाचं इंद्रधनुष्य ?

लेकरांना शिकवून खूप मोठं करू

मुलांच्या यशापुढे आनंदाने हरू

सखे, जाणूनी घे माझी विनंती

दे मला आता तू प्रेमाची स्वीकृती

मी तुझ्या प्रेमाला देते आहे होकार

आजन्म करते आहे तुझाच स्वीकार

आपल्या प्रेमाचा रंग आहे वेगळा

आनंदाने साजरा करू लग्नसोहळा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance