लग्न
लग्न
लग्न म्हणजे काय असत!
दोन हृदयांच मिलन असत!!
त्यातूनच फुलते फुलाची कळी!
निर्माण होई सुगंधित पाकळी!!
लग्न म्हणजे काय असत!
वधूवरांनी गुणदोषासहीत एकमेकांना स्वीकारायचं असतं!!
त्यातूनच घडतील कळीवर प्राथमिक संस्कार!
मग घडेल सुजाण भारताचा साक्षात्कार!!
लग्न म्हणजे काय असत!
तिच्यात वधूने सतीच व्रत पाळायच असतं!!
त्यातूनच कळीला मिळतो योग्य आकार!
होईल नैतिक मूल्यांचा परिचार!!
लग्न म्हणजे काय असतं!
आनंदाचं एक प्रतीक असतं!!
त्यातूनच जुळतात अनुबंध!
प्रेमाचा दुरवळतो सुगंध!!

