STORYMIRROR

Sayli Kamble

Inspirational

4  

Sayli Kamble

Inspirational

लग्न गाठ

लग्न गाठ

1 min
1.8K

लग्न म्हणजे प्रारंभ नवीन प्रवासाचा

जिथे माझे तुझे काही नसून संसार असेल दोघांचा


लग्न म्हणजे सोहळा नवीन नात्याचा

जिथे वर्षाव होतो शुभेच्छा आणि आशिर्वादाचा


लग्न म्हणजे उत्सव आपल्या संस्कृतीचा

जिथे दिसतो मेळ संमिश्र भावनांचा


लग्न म्हणजे तो क्षण ज्याची खूप असते आतुरता

मन मात्र बावरून जाते तो क्षण अनुभवता


लग्न बांधते गाठ दोघांच्या प्रितीची

वचने दिली जातात निभावण्या साथ जन्मांतरीची


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi poem from Inspirational