STORYMIRROR

Deepali Mathane

Inspirational

3  

Deepali Mathane

Inspirational

लेक

लेक

1 min
199

एक तरी लेक देवा 

खरचं घरोघरी असावी

सुवर्णमयी नक्षत्रांची आभा 

तिच्या चेहऱ्यावर दिसावी


   आसवांची ओल तिच्या 

   पापणीतही नसावी

  तिच्या जीवनातील प्रत्येक

   सकाळ हसरी असावी


तिच्या यशाच्या दीपांची

किर्तीमाळ उजळावी

आकांक्षांच्या पंखांना

घरच्यांची साथ मिळावी


    तिच्या मायेच्या कुंचल्यातून

   नवनवीन चित्रे रेखाटावी

   लेकीला पाहून माझ्या

    सगळ्यांची चिंताच मिटावी


तिच्या सुखदुःखांची रास

ओंजळीतूनही जपावी

निरागस मायेच्या झुळूकेने

सु-स्वप्नांची आरास सजावी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational