STORYMIRROR

Pandit Warade

Romance Action Thriller

2  

Pandit Warade

Romance Action Thriller

लावणी

लावणी

1 min
19

त्याच्या वाचून करमत नाही

आग विरहाची जाळते बाई

कसा झुरतोय मनाचा पारवा

मला झोंबतोय थंडीचा गारवा ।।धृ।।


भर ज्वानीनं काया मुसमुसली

चोळी दंडात दाटाया लागली

कोणी येऊन मस्ती माझी जिरवा

मला झोंबतोय थंडीचा गारवा ।।१।।


गडी असा पहिलवान फाकडा

भरला मनात मिशीचा आकडा

त्याला लवकर कुणीतरी बोलवा

मला झोंबतोय थंडीचा गारवा ।।२।।


छपन्न इंचाची छाती भरदार

राजहंसासम चाल डौलदार

त्याच्या सोबत रथातून फिरवा

मला झोंबतोय थंडीचा गारवा ।।३।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance