STORYMIRROR

Gangadhar joshi

Romance

3  

Gangadhar joshi

Romance

लावणी

लावणी

1 min
217

खेळु या इंद्रधनुचे रंग

राजसा जवळी बसा मझ संग


आली पंचमी काढ़ा पिचकारी

रंग भरा त्यात सोन केसरी

मिसळू त्या मधे इश्क कस्तूरी

सजवुया शृंगाराचे ढंग


हळूच मारा रंग पिचकारी

भिजु दे चिंब रंग अंगावरी

उफाड़ी काया मुसमुसलेली

घाला अंगणात च पलंग


काया माझी गेंद गुलजारी

जीव जडला तुम्हा वर भारी

मी राधिका तुम्ही माझे श्रीरंग

राजसा जवळी बसा मझ संग



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance