लावणी
लावणी
झाडामागून तुम्ही असं
बघू नका
हिरव्या कैरीला ..
हिरव्या कैरीला हात माझ्या लावू नका..२ ||धृ||
लयी भारानं वाकलयं झाडं
कोण टपोरी आलाय द्वाड..२
मिशी पिरगळून
फेटा उडवू नका..२
हिरव्या...||१||
साज रंग हिरवा
चढलाय भारी
गोड आंबट चवीची उभारी..२
डोळा चुकवूनी
खडा मारु नका...||२||
झाडं कैर्यांनी बहरलय झाडं
गंध मातीचा सांगे हे रान..२
लपून छपून
झाडावर चढू नका...२
हिरव्या कैरीला हात माझ्या लावू नका...||३||