लावणी
लावणी
श्रावण सरीनि धरती नटली
झाला रंग ओला हिरवा
अहो राया मला अहो सख्या मला घोड्या वरून फिरवा ।। ध्रु ।।
सजवा आता अबलक घोडा
घाला पायी सोनेरी तोडा
झूल पांघरा मखमलीचि
पुढ्यात आधी मला चढ़वा।।1।।
घोड्याची बी ऐट लई न्यारी
दिड़की चाल त्याची आहे भारी
भरल्या अंगाची दण कट स्वारी
नजरेत त्याच्या दिसतो पारवा ।।2।।
आंग माझ मुसमसलेल
ज्वानीने बी पुरतच् घेरल
लगाम इश्कचा धरून हाती
मिळू दे मज गारवा ।।3।।
रोज देते घोड्याला चन्दा
काळा राकट हा माझा बन्दा
दया सोडूनि आज रात च्याला
बघू दे त्याला चांदवा
अहो राया मला घोड्यावरुन
फिरवा ||4||

