STORYMIRROR

Pandit Warade

Romance

4.5  

Pandit Warade

Romance

लावणी( साजना)

लावणी( साजना)

1 min
10.6K



साजना,

लवकर तुम्ही याना, जवळ मज घ्याना

दूर काहो जाता, दूर काहो जाता

तुम्हाविन घडीभर करमत नाही आता ।।धृ।।


लागला कडक उन्हाळा

सोसल्या ग्रीष्माच्या झळा

लागेना डोळ्याला डोळा

आठवण करता, आठवण करता

तुम्हाविन घडीभर करमत नाही आता ।।१।।


ऋतू वसंत फुलला बाई

मोगरा, चमेली जाईजुई

बघा निसर्गाची नवलाई

प्रसन्न करी चित्ता, प्रसन्न करी चित्ता

तुम्हाविन घडीभर करमत नाही आता ।।२।।


कुणी केली कैसी किमया

जाहली सुगंधित काया

चालली ज्वानी ही वाया

अंत किती बघता, अंत किती बघता

तुम्हाविन घडीभर करमत नाही आता ।।३।।



रांगडी तऱ्हा ती न्यारी

मोरपंखी स्पर्श तो भारी

उठे अंगावर शिरशिरी

हात तव फिरता, हात तव फिरता ।

तुम्हाविन घडीभर करमत नाही आता ।।४।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance