लाखात
लाखात
शोधला मी मुलगा लाखात एक
तिखट बोल स्वभावाने तो नेक
दिन रात त्याच्या मागे पुढे पळते
गोड त्याची आठवण मनात सळते
मी माझा जीव त्याच्यावर ओवाळते
गोरा नाही इतका रंगाचा आहे सावळा
आपल्याच धुंदीत जगतो जगावेगळा
त्याच्या आठवणींना मनात सांभाळते
माझ्याच प्रेमात तो हसतखेळत जगतो
हात जोडून देवाकडे माझंच सुख मागतो
लाखात एक आहे तो स्वप्नात येऊन छळतो
वेडा तो माझ्यात मी त्याच्या प्रेमाची गीता
संगम शायरी सोडून आता लिहतो कविता
माझ्या जीवनाची वाट का त्याच्याकडे वळते

