लागला मज हा प्रेमरोग"
लागला मज हा प्रेमरोग"
प्रेमाच्या आणाभाका घेवूनी
धोका कां केला माझ्याशी सख्या
लागला मज हा प्रेमरोग
गेले मी व्यथेच्या सागरात,
आता काय करू कसे जगू
काय कामाचे हे जग तुझ्यावीणा..
करून कबाड कष्ट, सोसून ऊन वारा
फुलविला असता संसार आपला
गरिबित गोडीने हसून बोलून
काढला अलता हा काळ मिठी मारून...
प्रेम असतय स्वर्गसुखाची भरती
प्रेमाने अथांग भरलेल्या हा प्रेमालंकार
खऱ्या अर्थात सार्थक झाले असते जीणे
सांभाळला असता सख्या मी तुझा अहंकार...

