लागे कवितेची गोडी ( अष्टाक्षरी ओळकाव्य)
लागे कवितेची गोडी ( अष्टाक्षरी ओळकाव्य)
लागे कवितेची गोडी
वसे आनंद मनात
सुटतात सर्व कोडी
सुख येई जीवनात
येता तुझी आठवणं
लागे कवितेची गोडी
आहे खुपच प्रेमात
सख्या तुझी प्रेमवेडी
सुखावते प्रेम बेडी
दिसे साजन स्वप्नांत
लागे कवितेची गोडी
स्वप्नं तुझेचं डोळ्यांत
येते खुलून भावना
काढतोस फुका खोडी
मनी सतत कामना
लागे कवितेची गोडी
