कविता
कविता
त्या दुःखाच्या सागरातूनी
अश्रूंचा बांध फुटतो
काळीज घायाळ करूनी
नभात वात उठतो..
मग स्मृतींच्या ढगांतूनी धारा
वाहते क्षणा क्षणाला
पेरूनी विरह दुःख
हळवं करते मनाला..
गाव गोठाण भासते
टोचते शल्य जीवनाचे
निवडूंगी रानं जणू
काटेरी कुंपनाचे..
कधी मृगजळी स्वप्न पडते
नयन व्याकुळ होते
आशा जागवूनी जराशी
किनारा दूर जाते..
तेव्हा समग्र आठवणींचा
विरह ग्रंथ होतो
अन् कविता जीवनाचा
आवडता पंथ होतो
