STORYMIRROR

Balika Bargal

Inspirational

4  

Balika Bargal

Inspirational

कविता

कविता

1 min
194

आले शिक्षण आपुल्या दारी

स्त्रिये , तू घे भरारी

तुझ्या कर्तृत्वाचा वेलू ने गगनावरी॥ धृ॥


जरी अवतीभवती कौर्य , जरी अपुरे शौर्य

नच सोड धैर्य , अधांतरी

स्त्रिये तू घे भरारी ..॥१॥


जरी विपरीत काळ , जरी आबाळ

ठेव जगण्याचं बळ , अंतरी

स्त्रिये तू घे भरारी ॥२॥


जरी चेंगरले मन , झाले जखमी तन

असू दे भान , ध्येयावरी

स्त्रिये तू घे भरारी ॥३॥


शिक्षणाच्या संग , दे आयुष्याला रंग

बांध एक चंग , दृढ उरी

स्त्रिये तू घे भरारी ॥४॥


अंगी नवचैतन्य , दूर दुःख दैन्य

दाखव सौजन्य , सावित्रीपरी

स्त्रिये तू घे भरारी ॥५॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational