चारोळी
चारोळी
1 min
174
१ )
आज या रंगमहाली
खूप धुळवड झाली
रंगात रंगूनी साऱ्या
आली लाली गाली
२ )
अशी जडो तुझी माझी प्रीत
सदैव होवो मंगल जीवनगीत
सुरामध्ये सूर मिसळावे
व्हावे मधूर जीवनसंगीत
३ )
मज बहू आवडतो
तुझ्या जवळचा केवढा
येशील का परतूनी
वेणीत माळायला तेवढा
४ )
रंगात रंगले
यौवन कोवळे
सजवू नटवू
ऋतूचे सोहळे
५ )
तुझ्या प्रेमात जीव
झाला कातर कातर
आठवणीतच जाते बघ
आता रातर रातर
