नवरात्र उत्सव धार्मिक सामाजिक ' सांस्कृतिक ' स्वरूप आणि महत्त्व
नवरात्र उत्सव धार्मिक सामाजिक ' सांस्कृतिक ' स्वरूप आणि महत्त्व
भारतीय संस्कृतीमध्ये नवरात्र उत्सवाला धार्मीक ' सामाजिक , सांस्कृतिक दृष्टया अनन्यसाधारण असे महात्व आहे . उत्सव जवळ आला की सर्वांना खूप आनंद होतो . लहानथोरामध्ये एक वेगळ्या प्रकारचा उत्साह ओसंडून वाहतो .
नवरात्रीची एक जन्मकथा आहे. महिषासूर नावाचा एक अतिबलाढय' महापराक्रमी असा राक्षस होता तो अनेक प्रकारे देवदेवतांना त्रास देत असे . देवांनी अनेक वेळा त्याच्याशी युद्ध केले , पण प्रत्येक वेळी देवांचा पराजय झाला . मग सर्व देव ब्रम्हदेवाकडे गेले विचारविनिमय करून अस ठरल काि ' आदिशक्तीकडून महिषासुराचा वध होईल . यासाठी सर्व देवदेवतांनी आपआपल्या कडील शस्त्र ' तेज ' शक्ती देऊन तिला प्रकटण्याचे आवाहन केले . दुष्ट महिषासुराचा संहार करण्यासाठी आदिशक्तीने आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून अश्विन शुद्ध नवमीपर्यंत नऊ दिवस नऊ रात्री युद्ध केले व दहाव्या दिवशी महिषासुराचा वध करण्यात यश मिळाले. देवांनी आदिशक्तीचा जयजयकार केला. तो दिवस होता आणि अश्विन शुद्ध दशमीचा .
म्हणून आदिशक्तीच्या सन्माना प्रित्यर्थ नवरात्र उत्सव साजरा केला जातो. कुलदेवतेची घटस्थापना करून नवरात्र महोत्सवाला सुरुवात होते. एका पत्रावळीवर माती टाकून त्यावर छोटे मडके ठेवतात. त्यात पाणी भरतात व एक सुपारी टाकतात .आंब्याची पाने लावून वर मंडपी बांधतात मातीमध्ये विविध धान्ये मिसळतात नऊ दिवस थोड थोड पाणी दोन्ही संकाळ संध्याकाळी पूजवेळी घालतात . नागलेच्या ' कापसाच्या 'कराळाच्या ' विविध फुलांच्या माळा करुन घालतात . षडोपचार पद्धतीने पुजाआरती करतात . दहाव्या दिवसापर्यंत सुंदर असे धान येते तेच सोनं म्हणून विजयादशमीला देवाला वाहतात .आपट्याची पान सोनं म्हणून वाहतात. दहा दिवस सतत नंदादिप तेवत ठेवतात . घराला झेंडूच्या माळा घालून आंब्याची पाने लावून सजवतात .
नवरात्रात नऊ दिवस नऊ रुपांची पुजा केली जाते .१ ) शैल पुत्री २ ) ब्रम्हा चारिणी ३ ) चन्द्र घण्टा ४ )कूष्मांडा ५ ) स्कंदमाता ६ ) कात्यायनी ७ ) शुभंकरी ८ ) महागौरी ९ ) सिद्धिदात्री .
उमा गौरी ' पार्वती . जगदंबा ' भवानी ' दुर्गा , काली ' चंडी ' भैरवी ' चामुंडा अशा अनेक नावानेही संबोधले जाते . दहा दिशांचे प्रतिक असलेले दहा हात धारण केलेल्या या देवीला महामाया असे म्हणतात. तिच्या हातामध्ये जपमाळ; कमळ; शंख घंटा . तलवार 'ढाल ' त्रिशुळ ' कुऱ्हाड ' वज्र चक्र .दंडू , शक्ती ' कमंडलू ' डमरू ' धनुष्य ' गदा .पानपत्र , बाण अशी आयुधे आहेत .. जे भक्त एकाग्रचित्ताने माझी नित्य स्तुती करतील त्यांची सर्व बाधा व संकटे दूर करीन ' असे देवीने वचन दिले आहे म्हणून दुःखमुक्तीसाठी भवानीमातेची आराधना करण्याची प्रथा आहे
नवरात्र उत्साहाच्या निमित्ताने सर्वजन एकत्र येतात . आनंदाने ' एकमताने रोज पुजाआरती करतात . अनेक उपक्रम राबवतात . जसे -संगीत खुर्ची ' चित्रकला ' वक्तृत्व ' निबंध ' रांगोळी स्पर्धा आयोजित केली जाते . या निमित्ताने एका कुटूंबासारखे एकत्रित येतात . त्यामुळे जिव्हाळा ' आपलेपणा . प्रेम ' वाढीस लागते . आपल्या पूर्वजांनी साजरे केलेले पारंपारिक सण - उत्सव आपणही जपतोय याचा आनंद होतो . यातून पुढच्या पिढीला संस्कार महत्त्व ' सकारात्मक उर्जा मिळते . नऊ दिवस उपवास करतात ' काही लोक चप्पल सोडतात यामुळे अति निग्रहाने मनावर व शरीरावर ताबा मिळवला जातो .
विजयादशमीच्या दिवशी शमीच्या ( आपटा )वृक्षाची पाने सोने म्हणून लुटण्याची पद्धत आहे .' सोनं घ्या ' सोन्यासारख राहा ' असा त्याचा अर्थ आहे . सोनं जसं मूल्यवान असतं तसचं आपल जीवन मूल्यवान असतं . सोन्यासारख्या जीवनाचा योग्य विचारान ' सदाचारान उपभोग घ्यावा . कुठल्याही वाईट सवयी वाईट गोष्टी न करता चांगले संस्कार आत्मसात करावे . जीवनामध्ये खरा आनंद मिळतो.अशा रीतीने नवरात्र उत्सवाचे धार्मीक ' सामाजिक , सांस्कृतिक महत्त्व आहे .
