कविता
कविता
नुसते यमक जुळविल्याने
नाही होत कविता,
त्यासाठी फुंकावा लागतो प्राण ,
अन् वाहाव्या लागतात शब्दांच्या समिधा...
व्यक्त व्हावी कवितेतूनी ,
जीवनाची अथांग तृप्तता
नकोत शब्द खोटे परके ,
असावी त्यात दृढ सत्यता...
तिजकडे पाहताक्षणीच
लाभावी मनास शांतता
ऐकूनी मधूर बोल तिचे ,
व्हावी सकल वेदनांची पूर्तता...
वादळास झुंजण्याची
वाचून यावी धैर्यता
काळजाला आर्त भिडावी ,
अशी असावी सच्ची कविता ...
