कविता माझी सांगते
कविता माझी सांगते
मौनातीलही भाव माझे
कविता माझी सांगते
रूपेरी वाळूंचे हे घरटे
ती पून्हा-पून्हा बांधते
शब्द सागराच्या तळाचा
शिंपल्यातील मोती शोधते
रुतलेल्या क्षणातील जख्मा
मग ती हळूहळू मोजते
अव्यक्त भावनांचा
खूप पसारा आवरते
शब्दांचा घेऊनी आसरा
मला सखोल सावरते
दुःख असो कुणाचेही
कवितेतून ते पाझरते
सुकलेल्या अश्रूंना
जगा दाखविण्या घाबरते
अंतरीचे गूज सांगण्या
एक सखी मज रोज भेटते
कविता ही अंतर्मन माझे
भावनेतील शब्दन्-शब्द रेटते
