STORYMIRROR

Prashant Shinde

Abstract Action

3  

Prashant Shinde

Abstract Action

कविता करताना..!

कविता करताना..!

1 min
219

कविता करताना...!

कवितेला सजविण्या साठी

शब्द वेचुनी घेतले

काही गोरे काही काळे

काही गोड काही तिखट तेही पाहिले

थोडे शामल थोडे कोमल

काही राकट काही धडधाकट

सारे धष्ट पुष्ट अन समर्थ असे

निवडूनी एक एक असे वेचले

पण सरते शेवटी मजला

ते सारेच शेळपट वाटले

म्हणुनी मी आज गड्यांनो

भर चौकातच कवितेचे

टपरी वजा दुकान थाटले

भंगारातील शब्द सारे

गोळा करून मी आणले

पहावे वाटले मला एकादा

अर्थ कोणते त्या शब्दात साठले

खरेच ही किमया सारी

अचानकच बाबांनो घडली

कवितेच्या रचनेसाठी आज

शाई बोजड शब्दाविना सांडली....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract