STORYMIRROR

Prashant Kadam

Tragedy

3  

Prashant Kadam

Tragedy

कुणी न उरले कुणाचे !

कुणी न उरले कुणाचे !

1 min
492

एक काळ खरच होता असा

माणसाला माणसाची होती किंमत

साधे सर्दी पडसे झाले तरी

आप्त स्वकीय यायचे धावत

घरी येवून विचारपूस करायचे

आजारी माणसाला धीर द्यायचे

अर्धा आजार परतवून लावायचे

माणूसकीचे दर्शन घडायचे

आता मात्र विपरीत घडते

कोणास कोणाचे पडलेले नसते

प्रत्येक व्यक्ती आपल्याच कामात व्यग्र असते

भेटणे सोडा, साधे फोन करण्यास ही सवड नसते

बोलतांनाही मनात कदाचित घाकधूक असते 

नाहक सेवेस अडकण्याची भिती वाटते

कुणालाच कुणात अडकायचे नसते

कुणीच कुणाचे नसते हे तिथेच समजते.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy