कुंकू
कुंकू
हळद लावून आज माझे
पिवळे अंग केले तुझ्यासाठी
साथ देशील सख्या तू मज
संसारात जन्मभर माझ्यासाठी
लग्नाचा जोडा घालुन अंगी
मंडपात तुझ्यासोबत बसली
कुंकू लावून तुझ्या नावाचं
बघ मी रे खुदकन हसली
कुंकू तुझ्या नावाचं माझ्या
कपाळावर रोज रे लावते
तुझ्या जीवनातील सुख
माझ्या हास्यातूनच कळते