STORYMIRROR

Monali Kirane

Tragedy

2  

Monali Kirane

Tragedy

कुचंबणा

कुचंबणा

1 min
80

आमचं आणि नशिबाचं सततचं वाकडं आहे,

इकडेही वळव नजर जरा देवा तुला साकडं आहे.

आम्ही असतो हुशार पण आमचा नसतो कुठे वशिला,

तत्व येता आड ना लावत तूप कोणाच्या मिशीला.

हो ला म्हणतो हो आणि नाही ला सरळ नाही,

कुंपणावरच्या सरड्यासारखे सतत रंग बदलत नाही.

मानानी जी मिळते ती गोड मानतो भाकरी,

हॉंजी हॉंजी करून टिकवत नाही नोकरी.

दुर्मिळ होत्ये जात आमची लवकर कर काहीतरी,

समाज तरी बदल अथवा ने आम्हा दिगंतरी!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy