Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Samadhan Navale

Abstract Tragedy

3  

Samadhan Navale

Abstract Tragedy

कथा...

कथा...

1 min
173


'त्या' पूर्ण न झालेल्या स्वप्नाची,

त्या भरडल्या गेलेल्या दु:खी मनाची ||

होते डोळ्यात सजवलेले भरदिवसा..

मनातही भरलेली त्याची खुमारी,

मनाला क्षणभर वाटले आपलेसे

नव्हती अपेक्षा होईल क्षणात परके,

बुजेल असे वाटत नाही

दरी मनातील दुःखाची,

कथा...त्या पूर्ण न झालेल्या स्वप्नाची ||

'स्वप्न'...

ज्याला न पुर्ण करायचा प्रयत्न करावा लागतो,

न मी तो केला,

माहीत होते मलाही,प्रयत्न करूनही राहिले असते अपूर्ण

तरीही मनातुन न गेलेल्या...

'त्या' बेदखल स्वप्नाची,

कथा...त्या पूर्ण न झालेल्या स्वप्नाची ||

सगळीच स्वप्न, असतात का अपुरी ?

कि माझ्या प्रत्येक स्वप्नासारखी

असतात नुसती व्यर्थ करमणूक,

कुणाच्या भाग्यात,कुणास ठाऊक..

स्वप्नपूर्ती नसतेच का हो..?

जीवन आहे शोकांतिका, याचं दुःखाची,

कथा...'त्या' पूर्ण न झालेल्या स्वप्नाची ||


Rate this content
Log in