क्षुधा
क्षुधा
खोल जातो आवाज अंतरीचा
भूक ज्ञानाची वाढतच आसते
शब्द नको आता सांत्वनाचे ही
पोटाची खळगी रिकामी असते
तेव्हा ज्ञानाचे बोल काय कामाचे
क्षुधा जरी ज्ञानाची भागते जेव्हा
भय अंधार काळोख नशिबा नसे
भूक पोटाची तितकीच क्षणिक
शिरीरातली गरज जाणवून देते
नजरेत मायेची ती भूक जागते
क्षण भंगुर असते किती जीवन
गेले ते दिवस मागे वळुनी पाहते
आधार वड तो गळून गेल्यावर
क्षुधा त्या तुटलेल्या आशेत जागते
अशी कशी भूक देवा या जगी असते
क्षणाचीच गरज खरी महत्वाची ठरते
विसावल्या नजरेत थकवा नाही देत
उद्याची भूक आजची रात्र जागवते
