क्षुधा
क्षुधा
माझ्या मुंबईची क्षुधा,
कोणाला नाही हो कळली.
वापरून तिचीच शिडी,
तिच्याच जीवावर सारे उठली.
आधी ती सोन्याने मढवलेली दिसे,
ज्याला त्याला सिमेंट काँकरेन्टचे पिसे.
तिची क्षुधा डोळ्यातून वहात ही सुटली.
माणसात माणुसकी शोधुन ही नाही भेटली.
साधा माणुस हा दुनियेच्या,
जात्यातून भरकटून निघतोय.
चोरी करून स्वतः ची क्षुधा,
पूर्ण करणारा नेता होऊन फिरतोय.
स्वतः च्या क्षुधा पोटी,
रक्ताची ओळख विसरतोय.
खोट नाटक दाखवून,
तुझ्याच मानकुटीवर बसतोय.
आपली संस्कृती,
पाश्र्चिमात पुजतोय.
पाश्र्चिमात शैलीत वावरून,
आधुनिक म्हणून मिरवतोय.
क्षुधा ही दुसऱ्याच्या,
भल्यासाठी घेऊन जो जगतोय.
ईश्वर ही त्यांच्या पुढे,
नतमस्तक होऊन झुकतोय.
