क्षणभर...
क्षणभर...
त्या शापित वळणांवरती
आजही क्षणभर विसावती
मन त्या आठवणीत गुंतती
विरुनी गेल्या कथा जुन्या
वाटा ही जाहल्या पुराण्या
शब्द अडखळता या ओठी
मनात वादळा ची का भिती
त्या शापित वळणावरती
आजही क्षणभर विसावते
मन त्या आठवणीत गुंतते
नभाच्या मनास बिलगते
आसवांच्या सरीत भिजते
त्या शापित वळणावरती
मन पुन्हा ते क्षण जगते .....
त्या शापित वळणावरती
आजही क्षणभर विसावते
मन त्या आठवणीत गुंतते
डोळा भावनांची गर्दी दाटती
मनी काजवे ही कुजबुजती
कोवळ्या उन्हात सावली ती
करपली का कोमल फुले ती
त्या शापित वळणावरती
आजही क्षणभर विसावती
मन त्या आठवणीत गुंतती
शांत सागरीही येता भरती
मन उद्विग्न होते एकाकी
जहाल नव्हती ती काजळी
पसरली का उजळ्या राती
आज येता क्षणभर आठव ती
नजर खिळली त्या वळणावरती
त्या शापित वळणावरती
आजही क्षणभर विसावती
मन त्या आठवणीत गुंततती
त्या शापित वळणावरती
आज ही तीच कथा संगती
बेभान वारा हवेत मारवा
गुंग होती रान पाखरे ही
त्या शापित वळणावरती
आजही क्षणभर विसावती
मन त्या आठवणीत गुंतती

