क्षणभर थांब
क्षणभर थांब
किती पळशील
सदा जीवनात
क्षणभर थांब
जरा निवांतात 1
बघ उगवता
सूर्य गगनात
निहाळ तयाच्या
प्रभा आनंदात 2
पहा झुळुझुळु
वाहे तो निर्झर
निनाद ऐकण्या
थांब क्षणभर 3
सांजवेळी बघ
नभातील पक्षी
किती मनोहर
दिसतेय नक्षी 4
येता रवी नभी
कळ्या अलवार
फुलूनी डौलती
फुले हळुवार 5
बघ ही किमया
पहा खरोखर
क्षणभर थांब
आहे मनोहर 6
