क्षणाचे खेळ सारे
क्षणाचे खेळ सारे
क्षणाचे खेळ सारे
मंद जाहल्या चारी दिशा
सांज अशी वेन्धाळली
पाहण्या सखे हा सोहळा
नजर क्षितिजास भुलली
कातर काहूर मनी याही
भाव सांगण्या गोंधळली
सखी प्रियाची सांजखुळी
प्रीती बंधात त्या गंधाळली
मोहरली कळी मनीची ती
भ्रमरास रात्रही का भुलली
भाव अनामिक मनी या ही
क्षणचित्रं रेखाटण्यात गुंतली
कोरले जे चित्र नयनात
छबी हृदयी अलगद रुजली
क्षितिजासवे या सांजवेळी
नजर भावनेत अशी हरवली
क्षणाचे अल्वार ते पहारे
बहरास कळेना ते किनारे
भावानांचे सुरेल ते तराणे
भाव विभोर करी हे बहाणे
सोडवू कसे हृदय गुंतता
क्षितिजास का हे कळेना
भुलवुनी नजरेस का आता
दोष कुणाचा तेही सांगेना

