क्षण
क्षण
क्षणाची
आठवण
अन्
आठवलेली ती
क्षणभराचं
बालपण
अन्
गटवलेली
वेळ
ती
तिचे प्रश्न
अन्
स्तब्ध उभी
निव्वळ ती
लांब
गेलं बालपण
सरेलही तरुणपण
नजरेनं नजरेतून
पटवलेली ती
बोलली नाही तीही
बोललो नाही मीही
माझ्यासंगे
नाव
जोडलेली
अफवा ती .
मी विसरलो नाही
तीही नसेल विसरली
तोल जाता मी सावरलं
घसरलेली ती

