क्षण सुखाचे...क्षण दुःखाचे...
क्षण सुखाचे...क्षण दुःखाचे...
काही क्षण सुखाचे,
तर काही क्षण दुःखाचे....
सुखदुःखाच्या झुल्यावर,
उगीचच का झुलायचे..??
आठवावे कधीतरी
सुखाचे निवांत क्षण,
विरून जाइल त्यामधे मग
दुःखाच्या क्षणाची आठवण
सुखाच्या क्षणाला ,
आनंदी किनार,
दुःखाच्या वाटेवर ,
उदासीनतेचा मिनार
उदासीनतेच्या मिनाराला ,
पालवी फुटावी हास्याची,
हास्याची ही पालवी ,
बनेल नवचेतना सुखाची
