STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Inspirational

3  

Meenakshi Kilawat

Inspirational

कर्तव्य करत रहा

कर्तव्य करत रहा

1 min
671

 कर्तव्य करत रहा


'मी' पणा का गं तू सोडेना

तूच आहे ना ती मायाळू आई 

आणि बहिण श्रेष्ठ पुरूषाची

आपले कर्तव्य करत रहा बाई।।


तूच राधा अन् तूच सीता 

नाही होणार का तू प्रगतीची गीता

प्रेमाच्या कहाणीतली तू

सुरेख साजणाची प्रिय अस्मिता।।


तुझे ध्येय तुझी संकल्पना

काटा बनून तू तगू नको पुन्हा

मंगल पावित्र्य पतिव्रता वाढविते 

अक्षय आयुष्य पतीचे सज्ञाना ।।


रुक्मिणीचाही कृष्ण अन्

राधाचा ही कृष्ण सखा

पुरता डूंबला तो मिरेच्या

प्रेममय भक्तीतही अख्खा।।


गांधारी होवू नकोस तू

डोळ्यांवर पट्टी बांधू नकोस

अंध पतीचे डोळे होउन

नेटका संसार कर सावकाश।।


रामाने केले युद्ध रावणाशी  

पण होता राजा निष्ठावान भला

केली नाही त्यांनी दुसरी राणी

सीतेसाठीच तो तीळ-तीळ जळला ।।


लक्ष्मण वनात गेल्यावर

उर्मिलानेच घर सांभाळले

जबाबदारीने वागली म्हणून

हजारो सालाबादही नाव निघाले।।


गौतमबुद्धाने समाजबोध दिला

यशोधराने मिळविले आत्मज्ञान

दोघांचीही कर्तव्ये होती विशाल

मिटविले भोळ्या जनाचे अज्ञान।।



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational