करोनाचा खोकला
करोनाचा खोकला
नको बाई कोणाला फोन करूया
करोनाची रिंगटोन नको वाजवूया
कानाने धसकी घेतली
ऐकता उबळ खोकल्याची...
पटकन मी रूमालाने झाकले नाक तोंड
कळतच नाही वाजते की नाही रिंगटोन
जेव्हा समोरून येई हॅलोचा आवाज
तेव्हा जीव पडे भांड्यात…
पाहू कोणाची युक्ती छान
जो थांबवेल फोनचा खोकला
आयुष्यात प्रथमच झाला फोन ला खोकला
चीनच्या करोनाने व्यवहार केले ठप्प
घालूनी बेड्या माणसाच्या पायात
दिला संदेश जगाला
गुपचूप चार भिंतीत बसा
