क्रांतीज्योत(शोभाक्षरी)
क्रांतीज्योत(शोभाक्षरी)
तेवे सुवर्ण क्रांतिज्योत
प्रथा शृंखला शमवीत
ज्योत घेऊनी शिक्षणाची
थोर सावित्री कर्तृत्वाची
आणे पहाट स्वर्गमय
सोशे यातना असहाय्य
रोखे विधवा आत्महत्या
सती बालक भ्रणहत्या
दिले महान ज्ञानांजन
स्त्रीला हक्काचे वरदान
लेक शिकता प्रगतीची
झेप कल्पना, इंदिराची
करू प्रणाम सावित्रीस
झाला सफल अट्टाहास
मार्ग प्रकाश सोन्यासम
देश उध्दारी मनोरम
