STORYMIRROR

Trupti Naware

Abstract Others

3  

Trupti Naware

Abstract Others

कपाटाच्या कप्प्यातला कोपरा

कपाटाच्या कप्प्यातला कोपरा

1 min
460

 त्या मुर्तीत श्वास असता तर

त्याने ती तिथे ठेवलीच नसती 

त्याच्या श्रद्धेत विश्वास असता तर 

ही चुकच झाली नसती ...


कपाटाच्या कप्प्यातला कोपरा

जो रिकामाच होता कधी 

त्या मूर्तीच्या येण्याने तो कप्पा 

आनंदला होता .. 

परिस्थितीने कदाचित 

मनस्थिति बदलली होती 

मनस्थितीला बदलता आल असत 

तर, कसलीच भीती उरली नसती 


निर्जीव मूर्तीच्या अश्रुतला 

आकांत बोलत होता 

दोष द्यायचा उगाच कोणाला ?

वाद कपाटात कोंडला होता 

अबोल ,मुक्या भांडणाचा 

अंत पश्चातापात झाला होता 

पुसताना धूळ मूर्तीवरची

 त्याच्या अश्रूंचा आवाज आला होता . 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract