STORYMIRROR

Deepali Mathane

Tragedy

4  

Deepali Mathane

Tragedy

कोवळ्या कळ्या......

कोवळ्या कळ्या......

1 min
280

कोवळ्या त्या कळ्या निरागस

लोभस गोजिरवाण्या पाही

मोकळ्या श्वासातही सदा

कोवळा जीव गुदमरत राही....

     लाडाची लेक ती हुशार

    जीवापाड जपे मायबाप

    तिच्याच देहाचे लख्तर 

     दिसता उडे थरकाप....

असंख्य निर्भया शोधी

अस्तित्व ते आपुले

काय दोष असे आमचा

 मन संतापाने तापले.......

     वासनांध लांडगे फिरे

    ऐटीत स्वैराचाराने

   देहाचे तिच्या हाल पाहून

    मन सुन्न जाहले विचाराने.....

 निसर्गाची सुंदर कलाकृती

 निरागस ,ममतेने ओथंबलेली

मन हेलावून जाई जेव्हा

दिसे कळी कुस्करलेली.....

   का सुरक्षित नसे भाबडी

   अपुल्याच आजूबाजूला

   कोण असे जबाबदार    

   याभिषण अत्याचाराला....

म्हणूनच म्हणते पोरी 

जsssरा जपूनच रहा

तुझ्या किर्ती ने दुमदमु दे

विश्वातल्या दाहिदिशा...........



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy