कोरोनाचे नियम
कोरोनाचे नियम
कोरोनाचा कहर
कमी काही होईना,
म्हणून आज आपण
लढण्यास पुढे जाईना.
हात वारंवार धुवून
सॅनिटायझर वापरू या,
ठेवून सुरक्षित अंतर
कोरोनाला हरवू या.
मास्क वापरू सदासर्वदा
कधी ना नियम तोडे,
आहे जीवाची परवा तोवर
सोडवू जीवनाचे घोर कोडे.
लस घेऊन आपण
करूया जनजागृती,
महाभयंकर कोरोनाबद्दल
पसरवू नियमांची आवृत्ती.
मन करून घट्ट आज
पुढे होवू सारे तत्पर,
देऊ एकमेका साथ
सोडवून समस्या राहू हजर.
