STORYMIRROR

kusum chaudhary

Tragedy

3  

kusum chaudhary

Tragedy

कोरोना

कोरोना

1 min
178

या कोरोनाच्या पायी शाळा

झाली आहे बंद गुरुजी.

बालकांचे भविष्य कसे 

घडेल याची मला काळजी.


आॅनलाईन शिक्षणासाठी

आणायचे मी पैसे कोठून.

कोरानापायी गेली नोकरी

आहे आता घरीच बसून.


खायचे झाले वांदे आता

रात्रंदिवस आहे चिंतातूर.

केव्हा जाईल हा कोरोना

झालो आम्ही सारे आतूर.


कोरोनापायी लाॅकडाऊन

गेले माझे आप्त देवदारी.

रडलो ढसाढसा घरातच

 गेलोच नाही आप्ताघरी.


मन तीळ तीळ तुटले

 काही करता आले नाही

 भंयकर कोरोना जहरी 

कोणाचे काही चालत नाही.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy