कोरोना ऑन लाईन शिक्षण प्रणाली
कोरोना ऑन लाईन शिक्षण प्रणाली
कोरोना ऑन लाईन शिक्षण प्रणाली
काळाप्रमाने बदलते नेहमी शिक्षण पध्द्ती,
आज फक्त काही विद्दार्थी सुसज्जीत कक्षेत शिकती.
गांवखेड्यात जनावराच्या गोठ्यात आजही शाळा दुपारी,
अशा शाळेने ही दिले आहे नेता, अभीनेता व विज्ञानी.
भीम व एकलव्याने घेतली शिक्षा कक्षेबाहरुनी,
त्यांच्या तोडीचा शिष्य नाही पृथ्वीवर आजही.
चांगली शिक्षाणव्यवस्था असावी सरकारी,
म्हणुन भीमाने संविधानात व्यवस्था केली.
आदर्श शिक्षणपध्द्ती सत्तर वर्षात नाही आली,
आज कुठे पडकी शाळा व कुठे कक्षा बिना छताची.
सुलभ शौचालय व्यवस्था नाही मुलींनसाठी,
क्रिडांगन नाही शारिरीक,मानसिक बौद्धिक विकासासाठी.
सर्वांन साठी असावे सुसज्जीत शिक्षण सरकारी,
भीमाच्या स्वप्नाला बांधले व्यवस्थेने उबंरठ्यावरी.
कोरोना महामारीचा प्रकोप दिसतो घरदारी,
सामाजिक दुरी एकच उपाय महामारीवरी.
ऑनलाईन शिक्षणाने सुरक्षीत केली तरुण पीढी,
मग कां वाईट आहे ऑनलाईन शिक्षण प्रणाली ?.
नविन प्रोद्योगिचा परिणाम दिसतात दिर्घकाळी,
कोरोना ऑनलाईन शिक्षण प्रणाली म्हणुनच स्वीकारावी.
बहुजन समाज होता कित्येक शतकापासुन अज्ञानी,
ऑनलाईन गूगलमुळे बहुजन बनत आहे ज्ञानी.
शिक्षा फक्त देते चालना बुद्धीला प्रेरणा मिळण्यासाठी,
शिक्षणाचा सदउपयोग करने आहे शिष्याचा हाती.
ऑनलाईन शिक्षणातुन सुद्धा मिळते तीच संधी,
मग कशी वाईट असु शक्ते ऑनलाईन पध्दती ?.
