STORYMIRROR

Sidharth Waghmare

Abstract

3  

Sidharth Waghmare

Abstract

पर्यावरण

पर्यावरण

1 min
220

लोकसंख्येत...वृक्ष तोडीस...

लावा तुम्ही बंधन,

राखा पर्यावरणाचा समतोल, 

झाडांचे करा रक्षण,🌴 धृ🌴


लोकसंख्याही वाढते भरमसाठ,

झाडांची लावतो आपण वाट ,

जिथे मानव राहतो ,

तिथेच वस्ती अती दाट,

या विज्ञान युगात,

वाढते कारखानदारी,

वाहने वाढती घरोघरी, 

याने प्रदुषण वाढते भारी,

नका वापरू ज्यास्त इंधन,🌴१

राखा पर्यावरणाचा ..........


वृक्ष विषारी वायू शोषून, 

सर्वांना आक्सिजन देतात,

सर्व प्राण्यांना अमृत देण्याचे,

कार्य वृक्ष करतात,

जिथे तिथे लावा झाडे,

याने मिळेल सावली,

त्यांचे संगोपन करा, 

तुम्ही होवुन माऊली,

वृक्ष वाढीस लावा तुम्ही बंधन,🌴२

राखा पर्यावरणाचा............


वृक्ष तोडून आपले जीवन ,

घालून नका वाया,

चांगले आरोग्य ठेवण्याचा,

आहे तो एक योग्य पाया,

झाडें जगवले तर मिळेल 

शुद्ध हवा अन्न पाणी,

जंगलानेही होणार नाही, 

भुकंपासारखी हानी,

करावे झाडांचे मिळून जतन,🌴३

राखा पर्यावरणाचा...............


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract