STORYMIRROR

Sidharth Waghmare

Abstract

3  

Sidharth Waghmare

Abstract

माणसं गेली कुठे..?

माणसं गेली कुठे..?

1 min
387

माणसं आहेत हो तिथेच ,

फक्त काळ बदलला, वेळ बदलली,

माणसांची कामे बदलली,

तसा माणुसही बदलला , // धृ//


पुर्वी माणूस माणसांत होता,

वेळेचे भान होते, 

दुसऱ्यांवर विश्वास होता,

लहान मोठ्यांची जान होती,

एकमेकांवर माया होती,

चोरी करत नव्हती, 

सावलीची छाया होती, 

म्हणून माणसांना भिंती नव्हती,/१/

   माणसं आहेत हो तिथेच..........


पुर्वी दुधाला साय होती,

भाताच पाणी होतं,

मातीला वास होता,

सोबतांची साथ होती, 

लेकरांना मायेचं दुध होत,

बाटलीला कुणी शिवत नव्हत,

वृध्द माणसं सोबत होती,

आता सारखी वृद्धाश्रम नव्हती,/२/

    माणसं आहेत हो तिथेच.......


पुर्वी माणसांत माणूसपण होतं,

आता सारखा धाक नव्हता,

हातात चाकु, बंदूक नव्हती,

होती काठी तिचा आधार होता,

माणसा माणसांशी आदर होता,

मायेचा पदर होता, 

आता सारखी फिटं, आणि,

दिड फुटं प्यान्ट नव्हती,  //३//

    माणसं आहेत हो तिथेच.....


पुर्वी मोबाईल नव्हता,

भांडणे होती,तन्टे होती,

सोडवण्याची निती होती,

पण घडणाऱ्या दृश्यांची 

फोटो काढणारी माणसें नव्हती.

माणसांना वेळ होता, 

पैशाची होती हाव,

पण सध्या चाललेली धावपळ नव्हती,//४//

    माणुस आहे हो तिथेच ....


पुर्वी कार्यक्रम होती, 

किती दिवस माणसं राहत होती,

मायेची साथ होती, 

करण्याची जोड होती,

कामांची वृत्ती होती ,

अशी विकत घेऊन करणारे नव्हती,

गोडीने बसुन खाण्याची जोड होती,

कुणाला घाई नव्हती,. //५//

    माणसं आहेत हो तिथेच...


पुर्वी माणुस अज्ञान होता, 

सध्या युज्ञानाचे युग आहे, 

बटणावर सर्व चालत आहे, 

फक्त प्यायला पाणी होतें, 

आता सारखी टेबलं नव्हती,

असा गोंगाट नव्हता, 

सायंकाळी घुंगराचा आवाज होता,

शेतकरी मनाचा राजा होता, //६//

   माणसं आहेत हो तिथेच...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract