भ्रष्टाचार
भ्रष्टाचार
भ्रष्ट झाले सारे आचार
भ्रष्ट झाले सारे विचार
नाही म्हणता म्हणता हा
पुन्हा बोकाळला भ्रष्टाचार
अच्छे दिन येतील म्हणुन
आम्ही निवडले सरकार
यांनीही घातला घोळ नी
पुन्हा बोकाळला भ्रष्टाचार
अजुन मरतोय शेतकरी
नापिक कर्जाने तो बेजार
भुसंपादन च्या नावाखाली
पुन्हा बोकाळला भ्रष्टाचार
प्रत्येक गोष्टीसाठी पाकिट
करावा लागतो पाहुणचार
मेला सामान्य महागाइने
पुन्हा बोकाळला भ्रष्टाचार
अभिनय राहिला बाजुला
नुसता मेकपचा भडीमार
अशी झाली व्यथा आता
पुन्हा बोकाळला भ्रष्टाचार
