जीन आणि जीन्स
जीन आणि जीन्स
गरीबांना जीन्स फाटकी
घालावी लागते
श्रीमंतांना जीन्स
फाडावी लागते
दोघांच्याही जीन्स सारख्या
पण दोघांचेही जीन्स वेगळे वेगळे
संस्कृती जेव्हा विकृती वर हावी
होते ती असते पॅशन
विकृती जेव्हा संस्कृतीवर हावी होते
तेव्हा ती असते फॅशन
माणसाचे स्टेटस जीन्सवर ठरतं
जीन्सच्या पॅन्टवर नाही.
