STORYMIRROR

Mrs. Mangla Borkar

Abstract Tragedy

3  

Mrs. Mangla Borkar

Abstract Tragedy

स्वभाव

स्वभाव

1 min
188

स्वभाव नसतो कधीच सरळ


उभे असते बाजूला शांत वादळ


सांग कसे ओळखू ह्या स्वभावाला


औषध नाही ना ह्या रोगाला


हा सुंदर की कुरूप कसे ओळखणार


उजवी विचारताच तो डावी दिशा दाखवणार


ना त्यास जात ना धर्म


चूक वा बरोबर हाच धर्म


स्वभावात आहे तसे बरेच भाव कधी सरळ


तर कधी वाकडी जाते स्वभावाची नाव


कधी फुलाचा तर कधी रागाचा तीर


ज्याने जिंकले स्वभावास तोच खरा वीर


विस्मरून जगाला डोळे मिटता ओळखले स्वतःला


काहीही घडत नसताना पाहिलेय आनंदी स्वभावाला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract