STORYMIRROR

Pandit Warade

Action Inspirational

3  

Pandit Warade

Action Inspirational

कोरोना गीत

कोरोना गीत

1 min
139

कोरोनाने विश्व त्रासले झाले बहू बेजार ।

मृत्यू नाचे थयथय माजलासे हाहाकार ।।धृ।।


मानू नका कुणी लहान याला डोळ्याने जरी दिसत नसे ।

साऱ्या जगाला जाणवले तो सूक्ष्म परंतु बलाढ्य असे ।।

जागीच रुतले चक्र जगाचे ठप्प झाला व्यवहार ।।१।।


मी मी माझे म्हणणाऱ्यांची नशा क्षणातच उतरविली ।

राजा असो वा रंक तयाला जागा स्मशानी दाखवली ।।

सर्वांच्या मनी भरली धडकी आता कसे होणार? ।।२।।


बोलावल्या विन कुणाकडे हा स्वाभिमानी येत नसे।

बाधिताशी संपर्क झाला तर मग कुणाला सोडत नसे।।

सुरक्षितपणे घरात थांबा सांगत असे सरकार।।३।।


बनून देवदूत पोलीस, डॉक्टर, आम्हा साठी झिजत असे।

रुग्ण सेवेच्या ध्येयापुढे मुळी कुटुंबाचीही पर्वा नसे।।

संकटातून वाचवण्या झाले जिवावरती उदार।।४।।


नियम सारे आम्हासाठी त्यांचे आम्ही पालन करू ।

सकारात्मक ऊर्जेसाठी पुस्तकांचेही वाचन करू ।।

पंडित सांगे लॉकडाऊन मध्ये घरीच मी राहणार ।।५।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action