STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Tragedy Others

2  

नासा ( NaSa ) येवतीकर

Tragedy Others

कोरोना बसलाय गिळायला

कोरोना बसलाय गिळायला

1 min
152

नेहमीच पोरा तुझी ही घाई नको जाऊस बाहेर फिरायला

कोरोना बसलाय गिळायला हो कोरोना बसलाय गिळायला ।। धृ ।।

असे सण येती आणिक जाती आनंद मिळेल असला जिती मनात ठेव जरा

याची भीती विषाणू लागलाय फैलायला हो कोरोना बसलाय गिळायला ।। १ ।।

नको कुणाचा परका संपर्क रोग पसरतो होऊन संसर्ग घरातच राहा

तू कामात गर्क सर्वाना शासन सांगायला हो कोरोना बसलाय गिळायला ।। २ ।।

पाहुणे आले कोणी हो गावा चाचणी त्यांची करून घ्यावा थोडे ही दुर्लक्ष नको

करावा लागण होईल साऱ्या गावाला हो कोरोना बसलाय गिळायला ।। ३ ।।

मित्रानो तुम्हांला सांगतो ऐका धरू नका हो आपलाच हेका बाहेर निघणं

हे बरं हाय का सर्वाना सांगा घरी बसायला हो कोरोना बसलाय गिळायला ।। ४ ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy